सिल्लोड, (प्रतिनिधी) सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले. नगर परिषदेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते शहरातील मोहिमेचा शुभारंभकरण्यात आला.
यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम ही प्रत्येक बालकाच्या निरोगी भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. शून्य ते पाच वर्षे वयोगटातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये. प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याला पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस देऊन या राष्ट्रीय मोहिमेत सहभागी व्हावे असे अवाहन केले.
नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनीही नागरिकांना आवाहन करत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांचे लसीकरण करून पल्स पोलिओ मोहीम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे सांगितले. यावेळी उपनगराध्यक्ष विठ्ठल
आघाडीच्या सपकाळ, शिवसेना महिला दुर्गाबाई पवार, नगरसेवक रईस पठाण, सुधाकर गायकवाड, माजी नगरसेवक शेख सलीम हुसेन, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश विसपुते, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश वैष्णव, डॉ. सतीश सोनटक्के, डॉ. समिना पठाण, डॉ. रोहन राऊत, डॉ. अब्दुल समद, डॉ. गजानन खेडकर, डॉ. अर्चना
सपकाळ, डॉ. इब्राहिम शेख, डॉ. रामेश्वर फाळके, डॉ. संकेत ओस्तवाल, आरोग्य कर्मचारी रईस मुजावर, आजीम पठाण, शेख आमेर, विकास सपकाळ, अनिल राठोड, सतीश साळवे, गजानन अमृते, परिचारिका संगीता सोनवणे, संगीता जगताप, किलोतमा मटकर, कावेरी गवळी, दिपाली दांडगे, सत्यभामा सपकाळ, वंदना सूर्यवंशी, उज्वला सांगोळे, रिंकू वसावे, बालिका मिसाळ, सविता सुरे, राधा गायकवाड, उषा डकले, लता परदेशी, मंगला तमखाने, आशा सेविका लीला पैठणकर तसेच फहिम पठाण, जगन्नाथ कुदळ, दिलीप वाघ, देवराव भाग्यवंत आदी उपस्थित होते.












